मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या १४ दिवसांत करोनाची लागण झालेल्या ३९ कर्मचाऱ्यांची भर पडल्याने त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवरील ३९ कर्मचारी करोनाग्रस्त आहेत. गेल्या १४ दिवसांत ३९ कर्मचाऱ्यांची भर पडली. यात गुरुवारी १५ नवीन रुग्ण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. जगजीवन राम रुग्णालयात एकू ण १४३ रुग्ण दाखल असून यात १०० जणांना करोनाची बाधा आहे. त्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य रुग्णांचा समावेश आहे. एकू ण ४३ रुग्ण हे संशयित आहेत. यामध्येही मध्य रेल्वेचे ३३ कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. बाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांबरोबरच तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाडय़ांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. गुरुवारी १४ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले.रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गुन्हेगारीला आळा घालणारे लोहमार्ग पोलिसही करोनातून सुटू शकलेले नाहीत. गेल्या दोन दिवसांत दोन पोलिसांना करोनाची लागण झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona to 95 employees of central and western railway abn
First published on: 22-05-2020 at 00:40 IST