मुंबई: राज्यात गुरुवारी १०३ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर पाच मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ७४५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ५६ नवे करोनाबाधित

मुंबईत गुरुवारी ५६ नवीन करोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ५० जणांना लक्षणे नसून सहा जणांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.  गुरुवारी ४० करोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ झाली आहे. एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण १९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. सध्या एकही प्रतिबंधित झोपडपट्टी, चाळ किंवा इमारत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.