केवळ मुंबईकरच नव्हे तर आसपासच्या उपनगरवासियांचे आकर्षण बनलेल्या काळा घोडा महोत्सवातील टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वॉंडरिंग व्‍हाईट्स हॅण्डक्राफ्टेड ज्वेलरीच्या गौरी पाठारे यांनी ही कलाकृती साकारली आहे.

हेही वाचा >>>“अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!

पारंपरिक कलेहून हटके विचार करणाऱ्या गौरी यांनी पितळ आणि तांब्याचा औद्योगिक कचरा, अपसायकल केलेले चामडे, नदीतील दगड- खडक आणि नैसर्गिक तंतू यांचा विविध पद्धतीने पुनर्वापर करून अनोखे दागिने बनवते. हे आगळे वेगळे दागिने बनवताना यंत्र-तंत्राचा कमीतकमी वापर आणि हाती केलेली कारागिरी जास्त असते. निरुपयोगी ठरवलेल्या साहित्यातून वापरता येण्याजोगे विविध अलंकार तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: अवघ्या ५०० रुपयांसाठी हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळा घोडा कला महोत्सवात मांडलेली ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ ही गौरी यांची दुसरी कलाकृती आहे. टाकून दिलेल्या, मोडीत काढलेल्या आणि वाया गेलेल्या साहित्याचा या कलाकृतीत वापर करण्यात आला आहे. कचरा, भंगार समजल्या जाणाऱ्या या वस्तूंना नवा अर्थ दिला आहे. गोदीतील गियर्स, जुन्या विंडो एसी, मोटारगाड्यांची तुटलेली क्लच प्लेट, कॉपर एसी पाईप्स, फॅब्रिकेटरच्या कचऱ्यापासून पितळी प्लेट्स, इलेक्ट्रॉनिक मेटल वेस्ट, अगदी तुटलेले गोदरेज कुलूपही या कलाकृतीत वापरण्यात आले आहे.