मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानात सुरुवात झाली आहे. या मेळाव्यामध्ये सुरुवातीला शिंदे गटातील आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांची भाषण होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठच्या सुमारास भाषण करतील असं सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाआधीच या गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

पावसकर यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दिलेल्या भाषणात आदित्य ठाकरेंचा कोकरु असा उल्लेख करत गुजरातमध्ये महाराष्ट्रातील उद्योग जात असल्याच्या टीकेचा संदर्भ देत टोला लगावला. “हल्ली एक लहान लेकरू आमदार झालंय, मंत्रालयात जायला लागलं, कॅबिनेट मंत्रीही झाले. ते माध्यमांना सांगत आहेत की, नवीन मंत्रीमंडळ आल्यावर सगळे धंदे गुजरातला जायला निघाले आहेत. आपण त्याच्या ज्ञानाची किव करावी अशी स्थिती आहे,” असा टोला पावसकर यांनी आपल्या भाषणामध्ये लगवला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

तसेच पुढे बोलताना पवासकर यांनी आदित्य यांचे वडील म्हणजेच उद्धव ठाकरेंचाही संदर्भ ते मुंबईतील उद्योग धंदे बाहेर कसे गेले हे आदित्य यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घ्यावं असा खोचक सल्ला दिला आहे. “मुंबईतील किती धंदे बाहेर गेले, कसे गेले याचा या बाबाने (आदित्य ठाकरेंनी) अभ्यास करावा. तुझ्या बाबांकडून समजून घे. म्हणजे याची तुला कल्पना येईल,” असं पावसकर म्हणाले.

नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळेगावमधील वेदान्त-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन काही आठवड्यांपासून महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा असे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका करताना यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्यांची संधी गेल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच पावसकर यांनी मेळाव्यातील भाषणात आदित्य यांना टोला लगावला आहे.