राज्यातील १२ कामगार विमा योजनेची रुग्णालये राज्य शासनाने चालवावित की चालवू नयेत, असा प्रश्न पुढे आला आहे. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
राज्यात एकूण १३ कामगार रुग्णालये आहेत. त्यापैकी अंधेरी येथील एक रुग्णालय तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित १२ रुग्णालये चालवायची म्हटले तर राज्य सरकारवर त्याचा मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. शिवाय गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने सुमारे १५०० कोटी रुपयांचे अनुदान दिलेले नाही. त्यामुळे या रुग्णालयांचे काय करायचे, याचा मंत्रिमंडळात निर्णय करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.