एमबीबीएस व बीडीएसच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच राज्यातील अभिमत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रियाही ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची विद्यापीठाची मागणी होती. मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. स्थगिती मिळाली नसली तरी सोमवारी सुनावणी होईपर्यंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. २७ ऑगस्टला ही गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.  एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी सोमवापर्यंत तहकूब करत निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deemed university admission process
First published on: 27-08-2016 at 00:12 IST