मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंळवारी ( ७ फेब्रवारी ) वरळीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. दोघांनाही निवडणुकीच्या वेळी वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, असं ते म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Video: “कशाला स्वत:ची अब्रू…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!

काय म्हणाले दीपक केसरकर?

ज्यावेळी वरळीतील लोकं न्याय मागत होते, त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे लोकं मुख्यमंत्र्यांकडे आले आणि मुख्यमंत्र्यांनी पैशांची काळजी न करता कोळी बांधवांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार घेतला. त्याला जर आदित्य ठाकरे गल्लीत फिरणं म्हणत असतील तर आमची काही हरकत नाही, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं.

हेही वाचा – ‘वरळीतून लढून दाखवा,’ आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, जाहीर सभेत म्हणाले “अशी आव्हानं…”

मी वरळीतील प्रत्येक गल्लीत मोटरसायकलने फिरलो आहे. कारण तिथे गाड्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही कोळी वाड्यांसाठी इलेक्ट्रीकल दुचाकी मंजूर केल्या आहेत. त्यामुळे वयस्कर लोकांना पायी जाण्याऐवजी या दुचाकांचा वापर करता येतो. त्यामुळे या गल्ल्यांबाबत कमीपणा वाटून घेण्याचं कोणतंही कारण नाही. गल्लीत राहणाऱ्या कोळी बांधवांचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेकीच्या घटनेवरून अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे मत मिळावी म्हणून कोळी महोत्सवाला जातात. मात्र, याच कोळी बांधवांना कायमस्वरुपीचा रोजगार आम्ही देतो आहे. केवळ वरळीच नाही, तर संपूर्ण मुंबईची सेवा करण्याचे आमचं ध्येय आहे. ही सेवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत असताना आदित्य ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.