राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबई मेट्रोच्या आरेमधील प्रस्तावित कारशेडची. आरेमधील जंगल वाचवण्यासाठी हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, आता हा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने फिरवला असून हे कारशेड कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला केलेलं आवाहन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आरेचा मुद्दा उपस्थित केला.

यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण मला वाटतंय की उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान राखून कारशेडच्या बाबतीत मुंबईकरांचं हित हेच आहे की जिथे ते २५ टक्के तयार झालंय, तिथेच ते १०० टक्के तयार व्हावं कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे. “आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग…”, उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन!

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी त्यांना विनंती आहे की..”

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं उद्धव ठाकरे शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी विनंती फेटाळली

दरम्यान, संध्याकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची विनंती फेटाळून लावली आहे. “यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊच. उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान राखून मला असं वाटतंय की कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचं हित हेच आहे की जिथे कारशेड २५ टक्के तयार झालंय, तिथेच ते १०० टक्के तयार व्हावं, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis on aarey metro car shed uddhav thackeray reaction pmw
First published on: 01-07-2022 at 17:28 IST