विधिमंडळाचे सहा आठवडे चाललेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. गोंधळामुळे अधिवेशनाचा बराचसा कालावधी वाया गेला. पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली. सहा आठवडय़ांचे अधिवेशन असले तरी प्रत्यक्ष कामकाज २४ दिवस झाले. या कालावधीत १३४ तास प्रत्यक्ष कामकाज झाले असून, ६२ तास ३० मिनिटांचे कामकाज वाया गेले. दररोज सरासरी पाच तास, ३५ मिनिटे कामकाज झाले.
अजित पवार यांचे वक्तव्य, राज्यपालांचे निर्देश, आमदार-पोलीस संघर्ष, विरोधी आमदारांच्या मतदारसंघांसाठी निधी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ आदी विषयांवरून झालेल्या गोंधळात सभागृहाचे बरेचसे कामकाज वाया गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठ दिवसांचे कामकाज गोंधळात वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अधिवेशनात उभय सभागृहांमध्ये १० विधेयके मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2013 रोजी प्रकाशित
अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेर संस्थगित
विधिमंडळाचे सहा आठवडे चाललेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. गोंधळामुळे अधिवेशनाचा बराचसा कालावधी वाया गेला. पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली. सहा आठवडय़ांचे अधिवेशन असले तरी प्रत्यक्ष कामकाज २४ दिवस झाले.
First published on: 19-04-2013 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip walse patil declare budget session of maharashtra legislature over