मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिरायतीसाठी हेक्टरी ८,५०० रुपये, सिंचनाखालील पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये व बागायतींसाठी हेक्टरी २२,५०० रुपये मदत दिली जाईल.

गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. अवकाळीमुळे २२ जिल्ह्यांतील तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज या वेळी वर्तविण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी दिल्या. तीन हेक्टरच्या मर्यादेत आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच बाधित क्षेत्राची पाहणी करण्याची सूचना त्यांनी सर्व पालकमंत्र्यांना केली. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

live worms found in chocolate distributed to students in rajura taluka
चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
heavy rainfall in Gujarat Floods worst hits
Gujarat Floods: गुजरातमध्ये पुराचे थैमान, २६ जणांचा मृत्यू तर १८,००० जणांना सुरक्षित स्थळी हलविले; पंतप्रधानांकडून मदतीचे आश्वासन
Ladaki Bahin Yojana 3 thousand deposited in account and get only 5 hundred to 1 thousand rupees
लाडकी बहीण योजना : खात्यावर जमा केले ३ हजार अन् मिळताहेत केवळ पाचशे ते १ हजार रुपये! बँकांकडून कात्री…
Mumbai, road works Mumbai,
मुंबई : रस्ते कामांसाठीच्या खर्चात मोठी वाढ, साडेआठ हजार कोटींवर खर्च; लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश
Industry Minister Uday Samant informed that investment of one lakh crores will soon be made in the state
राज्यात लवकरच एक लाख कोटींची गुंतवणूक
The first installment of the Ladki Bahin scheme will be distributed on Saturday August 17 Pune news
‘लाडक्या बहिणीं’साठी जिल्ह्यातील विकासकामांची गंगाजळी रोखली? योजनेचा पहिला हप्ता वितरित झाल्यानंतरच निधी वाटप

हेही वाचा >>>दत्ता दळवींची कार अज्ञातांनी फोडली, सुनील राऊत म्हणाले, “हे कृत्य करणारे शिंदे गटाचे नामर्द…”

बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. बाधित क्षेत्रांचे पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती या वेळी मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आली. त्यावर राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावेत आणि एकत्रित निधी वितरणाचा निर्णय विभागाने घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

मदत किती?

जिरायती शेतीसाठी हेक्टरी ८,५०० रु.

आश्वासित सिंचनाखालील

शेतीसाठी हेक्टरी १७,००० रु.

बागायती पिकांसाठी हेक्टरी २२,५०० रु.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांस ४ लाख रु.

६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास २.५ लाख रु.

जखमींना ७४ हजार रु.

घराची पडझड झाल्यास ४ हजार ते ६.५ हजार रु.

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तीन हेक्टरच्या मर्यादेत त्यांना तातडीने मदत देण्यात येईल. पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी विभागाने तातडीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री