मुंबई :  करिअरच्या वाटचालीत योग्य दिशा आणि ती दाखवण्यासाठी योग्य वाटाडय़ा असणे गरजेचे असते. त्यासाठीच ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. करोनापश्चात करिअरचे चित्र कशा प्रकारे बदलत आहे. त्यामध्ये कोणत्या शाखेसाठी किती वाव आहे, एखाद्या विशिष्ट करिअरसाठी नेमकी कशा प्रकारे तयारी करायची, या सगळय़ाविषयी या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. सोशल मीडिया, सायबर लॉ, बायोटेक्नॉलॉजी यातल्या करिअर वाटांवर पुढे जाण्यासाठी नेमके

काय करायला हवे? स्पर्धा परीक्षांतून यशस्वी होण्याचा नेमका मार्ग कुठला, मेडिकल, इंजिनीअिरगमधील नव्या-जुन्या शाखांची माहिती या कार्यक्रमातून मिळेल. या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीने तारीख निवडू शकतात. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच ऑनलाइनसोबतच ऑफलाइन नोंदणीही आता करू शकता.

मुख्य प्रायोजक :

  • गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक :

  • विद्यालंकार क्लासेस
  • आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
  • सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय :

  • ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी
  • व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल
  • क्लासरूम एज्युटेक
  • सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअिरग अ‍ॅडमिशनस
  • कधी? : २७ आणि २८ मे   ल्लकुठे? : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

सहभागासाठी..  ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय असणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीप्रमाणे एका दिवसाची निवड करू शकतात.

http://tiny.cc/MargYashacha_27May किंवा

http://tiny.cc/MargYashacha_28May

येथे नोंदणी आवश्यक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेशिका येथेही.. रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे स. ९ ते १२ आणि  सं. ५ ते ८ या वेळात प्रवेशिका उपलब्ध आहेत.