दिशा प्रकल्पाद्वारे ‘वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमां’तर्गत उद्दिष्टे निश्चित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘जय वकील फाऊंडेशन’तर्फे  सध्या राबवण्यात येत असलेल्या ‘दिशा’ प्रकल्पांतर्गत राज्यभरातील मतिमंद शाळांमध्ये मूल्यमापनासाठी समान सूत्र वापरले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेल्यास अथवा शिक्षक नव्याने रुजू झाल्यास विद्यार्थी प्रगतीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचा अंदाज शिक्षकांना येऊ शके ल.

शून्य ते २० बुद्धय़ांक असणारे अतितीव्र मतिमंद, २० ते ३४ बुद्धय़ांक  म्हणजे तीव्र मतिमंद, ३५ ते ४९ बुद्धय़ांक  म्हणजे मध्यम मतिमंद, ५० ते ६९ बुद्धय़ांक  म्हणजे सौम्य मतिमंद, ७० ते ९० बुद्धय़ांक असणारे विद्यार्थी सीमारेषेवरील असतात. ९० ते १०० बुद्धय़ांक  सर्वसाधारण गणला जातो. बुद्धय़ांक आणि वयानुसार प्रत्येक मतिमंद विद्यार्थ्यांची गरज वेगळी असते. बुद्धय़ांक कमी असण्यासोबतच स्वमग्नता, अपस्मार, मेंदूचा पक्षाघात, अंधत्व, कर्णबधिरता अशा सहव्याधी काही विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे दिशा प्रकल्पातील ‘वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमां‘तर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उद्दिष्टे निश्चित करणारा ‘मूल्यमापन आराखडा’ शिक्षकांना दिला जाईल.

कु टुंबातून विद्यार्थी कोणत्या गोष्टी शिकू न आला आहे, याची माहिती जूनमधील प्राथमिक मूल्यमापनातून मिळू शके ल.

ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती मूल्यमापन आणि मार्चमध्ये अंतिम मूल्यमापन के ले जाईल. प्रत्येक वेळी मूल्यमापन के ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीत बदल के ला जाईल. दैनंदिन जीवनातील कार्ये, संभाषण, शैक्षणिक कार्ये, करमणुकीची कार्ये, सामाजिक वर्तणूक या पाच विभागांतील २०० घटक निश्चित करण्यात आले आहेत. एखादे काम करताना विद्यार्थ्यांला किती वेळा आधाराची गरज भासली याचे निरीक्षण के ले जाईल. त्यानुसार स्वावलंबी, परावलंबी की अंशत: स्वावलंबी यांची नोंद ‘मूल्यमापन तपासणी यादी‘त के ली जाईल. अंशत: स्वावलंबित्व क्वचित (१ ते ३५ टक्के  प्रगती), कधी कधी (३६ ते ७० टक्के  प्रगती), अनेकदा (७१ ते ९९ टक्के  प्रगती) असे मोजले जाईल. त्या आधारे पालकांसाठी काही उद्दिष्टे निश्चित के ली जातील.

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची संगणकीय नोंद ठेवण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

‘दिशा’ प्रकल्पामध्ये सर्व प्रकारच्या बुद्धय़ांकांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धत निश्चित के ली आहे. शिक्षकांसाठी उद्दिष्टे निश्चित के ली आहेत. पूर्वी विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेला असता तेथील शिक्षकांना त्याच्या पार्श्वभूमीची कल्पना नसे. पण आता समान मूल्यमापन पद्धतीमुळे शिक्षकांना विद्यार्थी प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे निकालपत्र पाहून कळू शकेल.

– सुजाता आंबे, मुख्याध्यापिका, कामयानी शाळा, पुणे</strong>

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha project in school for mentally retarded children in maharashtra zws
First published on: 15-07-2020 at 03:26 IST