बॉम्बे हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर अंघोळ करीत असताना मोबाइलद्वारे चित्रफीत तयार करणाऱ्या यश शहा नावाच्या डॉक्टरला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. डॉ शहा रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात काम करतो.
बॉम्बे हॉस्पिटलमधील पदव्युत्तर वसतीगृहात हा प्रकार घडला. तक्रारदार महिला डॉक्टरांसाठी असणाऱ्या बाथरूममध्ये अंघोळ करीत असताना तिला वरील बाजूस संशयास्पद वस्तू दिसली तेव्हा तो मोबाइल असल्याचे निष्पन्न झाले. महिला डॉक्टर अंघोळ करत असतानाचे दृश्य या मोबाइलमध्ये चित्रित झाले होते. या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी डॉ. शहा याला अटक केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी दिली. त्याच्यावर आयटी कलमाअर्तगत गुन्हा दाखल केल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून पुढील तपासासाठी तो न्यायवैद्यकप्रयोगशाळेत पाठवला आहे.
बॉम्बे रुग्णालयाचे प्रवक्ता डॉ सागर सागळे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या डॉक्टरला अटक
बॉम्बे हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर अंघोळ करीत असताना मोबाइलद्वारे चित्रफीत तयार करणाऱ्या यश शहा नावाच्या डॉक्टरला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली.
First published on: 19-12-2013 at 02:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor arrested for making porn video of a woman doctor