लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे माझ्याविरोधातील षडयंत्र असून यामध्ये मला पद्धतशीरपणे गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया देत शरीरसौष्ठवपटू सुहास खामकरने त्याच्यावरील लाचखोरीचे आरोप फेटाळले आहेत.
पनवेलचा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या सुहास खामकरला सोमवारी ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. दरम्यान माध्यमांशी बोलताना सुहास खामकर म्हणाला की, “मी लाच घेतलेली नाही. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. हे माझ्याविरोधातील षडयंत्र असून यामध्ये मला पद्धतीशीरपणे गोवण्यात येत आहे. अशा प्रकरणात मला फसवलं तर मी संपेन असे अनेकांना वाटेल, मात्र मी आतापर्यंत देशासाठी खेळलो आहे आणि यापुढेही खेळत राहणार. उलट मी अधिक जोमाने काम करेन आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेन.” असेही सुहास म्हणाला आहे.



