मुंबई : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व दिल्लीतील १४ ठिकाणी शुक्रवारी छापे टाकले. बँक फसवणूक प्रकरणात मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इतरांविरुद्ध ही शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. या कारवाईत बँक ठेवी, म्यच्युअल फंड अशी पाच कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. बँक समुहाची ४९५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ बडोदाने याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांनी कट रचून बँकांचे नुकसान केले व गैरव्यवहाराची रक्कम बनावट व्यवहारांमार्फत इतरत्र वळवल्याचा आरोप आहे.

हेही वाचा…ठाणे भाईंदर प्रकल्प लवकरच मार्गी, ‘एमएमआरडीए’च्या एकत्रित निविदेला पाच कंपन्यांचा प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीच्या तपासानुसार, मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवर्तकांनी विविध बनावट संस्थांच्या बँक खात्यांद्वारे निधी वळवण्यासाठी कागदोपत्री व्यवहार दाखवले. त्याद्वारे निधी वळवून अचल मालमत्ता खरेदी करण्यासाठी संशयास्पद तृतीय पक्ष व्यवहार केले गेले. या मालमत्तांच्या खरेदीबाबतची संशयीत कादपत्रांची तपासणी सुरूआहे. याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.