अलीकडेच शिवसेना ( ठाकरे गट ) ज्येष्ठ नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं सूपुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या प्रवेशाने कोणताही फरक पडणार नसल्याचं ठाकरे गटातील नेत्यांनी सांगितलं. पण, आता या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, मला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का? असं खडसेंनी विचारलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानपरिषदेत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “भूषण देसाईंनी वडिलांची साथ का सोडली? अनेक वर्ष त्यांनी एमआयडीचं काम अप्रत्यक्षपणे सांभाळलं. मात्र, एकाएकी असं का वाटलं. त्याचं कारण भूषण देसाईंनी चार लाख १४०० स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचं अवैध पद्धतीने वाटप केलं होतं. त्यात ३ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत खासदार इम्तियाज जलील आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.”

हेही वाचा : आमदार-खासदारांनाच पेन्शन का? कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बच्च कडूंचं सडेतोड उत्तर; म्हणाले…

“यावर नागपूर अधिवेशनात उद्योगमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता तो अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का?,” असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

“भूषण हा सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहेत, म्हणून तातडीने ही पावले उचलण्यात आली. हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्याचं भूषणला कळवण्यात आलं. पण, नाथाभाऊचा घोटाळा अर्ध्या एकरचा असल्याचं मत काहीजणांचं आहे. तरीही, माझ्या जावायला आत टाकलं, मुलगी आणि माझ्यामागे चौकशीचा सरोमिरा लावला,” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची निधीवरून अजित पवारांसमोर जोरदार टोलेबाजी; आठवलेंच्या कवितेचा आधार घेत म्हणाले…

“मग भूषण देसाईंचा घोटाळा हा ४०० हेक्टरचा आहे. तो आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली आल्याने पावन झाला का? माझा एक रूपयांचा संबंध नसताना माझ्यामागे चौकशीचा सरोमिरा लावला. मला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावला का?,” असा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse attacks shinde fadnavis government over subhash desai son bhushan desai ssa
First published on: 15-03-2023 at 18:10 IST