मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस हिरवा कंदील दाखविल्यानंतर सरकारने शुक्रवारी नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यानुसार एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते या ज्येष्ठ मंत्र्यांकडे दोन दोन  जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून शिवसेनेचे रामदास कदम यांना थेट मराठवाडय़ात धाडण्यात आले आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्य़ाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मुंबई शहर जिल्ह्य़ाची जबादारी सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली असून मुंबई उपनगर जिल्ह्य़ांचे पालकमंत्री म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्याची, तर गिरीश बापट यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री पुढीलप्रमाणे :  
सुभाष देसाई (मुंबई शहर), विनोद तावडे (मुंबई उपनगर), एकनाथ शिंदे (ठाणे), विष्णू सावरा (पालघर), प्रकाश मेहता (रायगड), रवींद्र वायकर (रत्नागिरी), दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), राम शिंदे (अहमदनगर), गिरीश महाजन (नाशिक, नंदुरबार), दादाजी भुसे (धुळे), एकनाथ खडसे (जळगाव, बुलढाणा), गिरीश बापट (पुणे), विजय शिवतारे (सातारा), चंद्रकांतदादा पाटील (कोल्हापूर, सांगली), विजय देशमुख (सोलापूर), प्रवीण पोटे(अमरावती), रणजित पाटील (अकोला, वाशिम), संजय राठोड (यवतमाळ), चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), सुधीर मुनगंटीवार (वर्धा, चंद्रपूर), दीपक सावंत (उस्मानाबाद, भंडारा), राजकुमार बडोले (गोंदिया), राजे अम्ब्रीशराव अत्राम (गडचिरोली), रामदास कदम (औरंगाबाद), बबनराव लोणीकर (जालना), दिवाकर रावते (नांदेड, परभणी), दिलीप कांबळे (हिंगोली), पंकजा मुंडे (लातूर, बीड).