scorecardresearch

Premium

मुंबई, पुणे, संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरू निवड समिती स्थापन

राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या स्थापन केल्या आहेत.

bhagatsingh koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर व अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील.

pune university, pune city of universities
वर्धापनदिन विशेष : विद्यापीठांचे पुणे
pune mns student wing president amit thackeray s marathi news, amit thackeray marathi news, amit thackeray latest marathi news
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने आठ दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा…”, अमित ठाकरेंचा इशारा
nagpur university vice chancellor suspended marathi news
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरी निलंबित, राज्यपालांकडून कारवाई, जाणून घ्या सविस्तर
abvp march, Chaturshringi Temple
‘अभाविप’कडून चतुःश्रुंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे या समितीचे सदस्य असतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Establishment vice chancellor selection committee mumbai pune sanskrit university governor ysh

First published on: 30-09-2022 at 00:02 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×