प्रसाद रावकर

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहर खड्डेमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल सहा हजार कोटी रुपयांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र ती पूर्ण होण्यास तीन वर्षे लागणार असल्यामुळे यंदा खड्डे बुजवण्यासाठी वेगळीवेगळी कंत्राटे देण्यात आली आहेत. त्यासाठीच्या खर्चाचा यंदा पालिका प्रशासनाने विक्रमच केला आहे. खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या कंत्राटाचा कालावधी सुरू असतानाच पावसाळय़ाआधी खड्डे बुजवण्यासाठी एक ८२ कोटी रुपयांचे आणि प्रत्यक्ष पावसाळय़ात खड्डे बुजवण्यासाठी दोन नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले दुसरे १२५ कोटी रुपयांचे अशी वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली आहेत. डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आणखी एक कंत्राट दिले आहे. तरीही जुलैच्या पावसाने मुंबईतील रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. खड्डय़ांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने यंत्रणा उभारली आहे. त्यावर जेमतेम पाचशेच्या आत तक्रारी आल्या असल्या तरी समाजमाध्यमांवरील तक्रारींच्या आधारे महानगरपालिकेने आतापर्यंत साडेसहा हजाराच्या आसपास खड्डे बुजवल्याचे स्वत:च जाहीर केले आहे. म्हणजे मुंबईत यापेक्षाही शेकडोपटींनी जास्त खड्डे आहेत. ते बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण भरपावसात खड्डय़ांच्या बाहेर येऊन रस्त्यावर आणखी चिखल होत आहे. दक्षिण मुंबईतील गुळगुळीत रस्ते सोडले तर उर्वरित मुंबईत विशेषत: उपनगरांत रस्त्यांची चाळण झाली आहे. विक्रोळी स्थानक परिसर, कुर्ला, जुहू कोळीवाडा, ओशिवरा, अंधेरी पूर्व, मरोळ, वांद्रे ते थेट बोरिवलीपर्यंतच्या एस. व्ही. रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

खड्डयांमुळे मुंबईत अपघाती मृत्यू झाल्याची नोंद नसली तरी खडबडीत रस्ते, पावसाच्या पाण्याची डबकी यामुळे दुचाकीस्वारांची हाडे खिळखिळी होत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबईतील वाहतूक मंदावली आहे. खड्डय़ांची तक्रार आल्यानंतर ४८ तासात ते बुजवण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे. ते पूर्ण होताना समाजमाध्यमांवर दिसते. मात्र आता बुजवलेल्या खड्डय़ातील मिश्रण बाहेर आल्यामुळे चिखल होत असल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. एमएमआरडीए आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील वादामुळेही जेव्हीएलआर, एस. व्ही. रोड, आणि मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे.