अत्यावश्यक सेवांच्या नावाने बनावट ओळखपत्र

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मंजुरी दिल्यानंतर पुन्हा सामान्य प्रवाशांकडून लोकल प्रवासासाठी प्रयत्न होत आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांकडून एक हजार ओळखपत्र जप्त; आरोग्य सेवेसोबत पालिका, बँकांच्या नावाचा वापर

मुंबई : टाळेबंदीच्या काळात उपनगरीय रेल्वेतून केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासास परवानगी असल्याने अनेक प्रवाशांनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून रेल्वे प्रवास करण्याची धडपड चालवली आहे. गेल्या वर्षी आणि सध्या सुरू असलेल्या र्निबधांच्या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर अशा प्रकारची एक हजार बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली.  यात आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत असल्याची बनावट ओळखपत्रेच जास्त असून त्यापाठोपाठ पालिका कर्मचारी असल्याचीही ओळखपत्रे अधिक आढळल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात बंद असलेली लोकल जून २०२० मध्ये के ंद्र, राज्य सरकार, पालिका कर्मचारी व त्यांच्या परिवहन सेवांचे कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. रस्ते प्रवास परवडत नसल्याने खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य श्रेणीतील कर्मचारी बनावट ओळखपत्र बाळगून लोकल प्रवास करु लागले होते. अत्यावश्यक सेवांच्या नावाने ओळखपत्र ठेवून प्रवास करताना तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांकडून त्यांची धरपकडही करण्यात आली. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर गेल्या वर्षांत असे ७५० हून अधिक बनावट ओळखपत्र प्रवाशांकडून जप्त के ले. त्यानंतर फे ब्रुवारी २०२१ पासून सामान्य प्रवाशांना ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी दिली. परंतु लोकल गाडय़ांना प्रचंड गर्दी आणि करोनाची दुसरी लाट पाहता एप्रिल महिन्यापासून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मंजुरी दिल्यानंतर पुन्हा सामान्य प्रवाशांकडून लोकल प्रवासासाठी प्रयत्न होत आहेत. यात अत्यावश्यक सेवांचे बनावट ओळखपत्र तयार करून प्रवासी प्रवास करत असून अशी आणखी २०० हून अधिक ओळखपत्रे जप्त करण्यात आली.

‘आरोग्य कर्मचारी’ सर्वाधिक

गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या जवळपास १००० हजार बनावट ओळखपत्रांमध्ये आरोग्य कर्मचारी असल्याची सर्वाधिक ओळखपत्रे आहेत. यात रुग्णालये, विविध प्रयोगशाळा, औषध कं पन्यांबरोबरच करोना उपचार केंद्रांच्या नावानेही ओळखपत्र प्रवाशांकडे सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रवाशांचे ओळखपत्र जप्त करतानाच ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांकडून त्या प्रवाशाला सक्त ताकीदही देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरातील विविध पालिकांच्या नावानेही ओळखपत्रे मिळाली असून यात मुंबई पालिके च्या नावाने तयार झालेल्या ओळखपत्रांचाही समावेश होता.

सहा लाखांचा दंड

बनावट ओळखपत्र जप्तीची कारवाई करतानाच एप्रिल महिन्यापासून विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेने ५०० रुपये दंड आकारणी करण्याची कारवाईही के ली आहे. परवानगी नसतानाही प्रवासाचा प्रयत्न करणाऱ्या १,२०० प्रवाशांना पकडण्यात आले आहे. एकूण सहा लाख रुपये दंड वसूल केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fake identity card in the name of essential services ssh

ताज्या बातम्या