पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बोरिवली ते विरार दरम्यानच्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गिकेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत पाचवी – सहावी मार्गिका सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. तसे झाल्यास मेल, एक्स्प्रेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. परिणामी, भविष्यात चर्चगेट – विरारदरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढतील आणि जलद लोकल प्रवास अधिक सुकर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बोरिवली ते विरार पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम एमआरव्हीसीकडून करण्यात येणार आहे. एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी दोन हजार १८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई, ठाणे, पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

या प्रकल्पाची संकल्पना योजनाही मंजूर करण्यात आली आहे. मार्गिकेत पादचारीपूल, भुयारी मार्गाचाही समावेश आहे. एमयूटीपी-३ एमध्ये बोरिवली – विरार पाचव्या – सहाव्या मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. एमआरव्हीसीने या प्रकल्पावर काम सुरू केले असतानाच मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली पाचवी, सहावी मार्गिका मात्र प्रतीक्षेतच आहे.

वांद्रे टर्मिनस मार्गे पाचवी मार्गिका जाऊ शकते का याबाबतही विचार सुरू –

पश्चिम रेल्वे मार्गिकेचे काम सुरू केले असून मुंबई सेन्ट्रल – बोरिवली दरम्यानच्या पट्ट्यात वांद्र्यापासून बोरिवलीपर्यंत पाचव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंबई सेन्ट्रल ते दादरदरम्यान कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र वांद्रे ते माहिमपर्यंत पाचवी मार्गिका अद्यापही बनलेली नाही. मार्गिकेत काही काही अतिक्रमणे अडथळा बनली असून काही स्थानिकांनी स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला आहे. यामुळे या टप्प्यातील मार्गिकेचे काम रखडले आहे. वांद्रे टर्मिनस मार्गे पाचवी मार्गिका जाऊ शकते का याबाबतही विचार सुरू आहे. पाचव्या, सहाव्या मार्गिकेला जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे ते खारदरम्यान असलेला जुना पूल पाडून त्याच्या बाजूलाच नवीन रेल्वेपूल उभारण्याचा विचार आहे. सहाव्या मार्गिकेचे काम मात्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यालाही गती दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल फेऱ्याही वाढण्यास मदत होणार –

सध्या चर्चगेट – विरारदरम्यान दोन धीम्या आणि दोन जलद मार्गिका उपलब्ध आहेत. पाचवी – सहावी मार्गिका नसल्याने मेल, एक्सप्रेस जलद मार्गिकेवरूनच धावतात. त्याचा परिणाम लोकलचे वेळापत्रक आणि मेल, एक्स्प्रेस गाड्यांवर होतो. संपूर्ण पाचवी – सहावी मार्गिका सुरू झाल्यास चर्चगेट – विरारदरम्यान जलद लोकल प्रवास आणखी सुकर होईल आणि लोकल फेऱ्याही वाढण्यास मदत होईल.