मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. पीडित तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचाही संशय आहे. वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच पीडितेवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. यावर आता पीडित तरुणीच्या वडिलांनी प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित तरुणीचे वडील म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलीला मुंबईत वसतिगृहावर सोडवायला जायचो तेव्हा ओम प्रकाश कनौजिया नेहमी मला माझ्या मुलीची काळजी घेईल, असं आश्वस्त करायचा. तसेच तिला जे लागेल त्याची व्यवस्था करेल असं सांगायचा. मी त्याच्यावर विश्वास टाकण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच्या मनात काय आहे हे माहिती नव्हतं.”

हेही वाचा : …आणि एका चावीने मुंबईतील विवस्त्र मृतदेहाचं गूढ उलगडलं, नेमकं काय घडलं वाचा…

“वसतिगृह प्रशासनाने आमच्या मुलीच्या तक्रारीची दखल घेतली नाही”

पीडितेच्या वडिलांनी वसतिगृहाच्या वॉर्डन आणि अधिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली. “वसतिगृह प्रशासनावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. कारण आमची मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला रहावं लागणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी आमच्या मुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत कारवाई करायला हवी होती,” अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father of physical abuse murder victim tell shocking information about accused pbs
First published on: 09-06-2023 at 09:09 IST