आरेतील मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात भराव

युनिट १९ येथे चार एकर जागेवर भराव केला जात असल्याचे एप्रिलमध्ये पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आले.

चौकशीचे आदेश

मुंबई : आरे जंगलातील युनिट १९ जवळ, जेव्हीएलआरच्या सीमेलगत मागील सहा महिन्यांपासून भराव टाकण्यात येत असून हा भराव मिठीनदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात टाकण्यात आला आहे. हा भराव काढून टाकला नाही तर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.

युनिट १९ येथे चार एकर जागेवर भराव केला जात असल्याचे एप्रिलमध्ये पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आले. सेव्ह आरे, वनशक्ती आणि रिवायडिंग आरेच्या माध्यमातून पोलिसांपासून संबंधित सर्व यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल पोलीस वा सरकारी यंत्रणांनी घेतली नाही. भराव टाकण्याचे काम सुरूच आहे असून आरेत अन्य ठिकाणीही भराव टाकला जात असल्याचा आरोप रिवायडिंग आरेचे संजीव वल्सन यांनी केला. युनिट १९ येथे ज्या जागेवर भराव टाकण्यात येत असलेल्या जागेपैकी काही जागा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला पेट्रोल पंप उभारण्यासाठी २०१६ मध्ये दिल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोल पंपासाठी काही चौरस फुटांचे क्षेत्रफळ देण्यात आले असताना चार एकर जागेवर भराव कसा टाकला जात आहे. मुळात ही जागा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत असून हे मिठीनदीचे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही काम करता येत नसताना येथे पेट्रोल पंपाला परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी उपस्थित के ला असून  याप्रकरणी भरणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

भराव लवकरात लवकर काढून टाकला नाही तर पुराचा धोका वाढेल. त्यामुळे त्वरित भराव काढून टाकावा. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही पर्यावरण प्रेमींनी केली. पर्यावरण प्रेमींच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत भरणे यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे जोशी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fill catchment area mithi river area ssh