मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांना अटक केली आहे. दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर कमल मिश्रा यांनी पत्नीला कारखाली चिरडलं होतं आणि पळ काढला होता. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नऊ दिवसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई: मॉडेलबरोबर रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्यानंतर चित्रपट निर्मात्याने पत्नीला गाडीने उडवलं; धक्कादायक Video

१९ ऑक्टोबरला अंधेरीत ही घटना घडली होती. कमल मिश्रा आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये कारमध्ये एका महिलेसोबत बसले होते. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना पाहिलं होतं. तिने विरोध केल्यानंतर कमल मिश्रा यांनी तिच्या अंगावर कार घातली होती. यावेळी एका व्यक्तीने धाव घेत त्यांना रोखलं होतं. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला होता.

गुरुवारी पत्नीने तक्रार केल्यानंतर कमल मिश्रा यांना अंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. त्यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कमल मिश्रा यांनी ‘देहाती डिस्को’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमल मिश्रा ययांनी पत्नी पतीच्या शोधात पार्किंगमध्ये आली होती. यावेळी तिने कारमध्ये पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत पाहिलं. जेव्हा ती जाब विचारण्यास गेली तेव्हा कमल मिश्रा यांनी गाडीतूनच पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी कारखाली आली होती. त्यांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे.