मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अंतिम फेरीची गुणवत्ता यादी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये प्रसिद्ध होत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी दिली.

यंदा राज्यातील ९,५३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१,५९,२३२ इतकी प्रवेशक्षमता उपलब्ध असून, यासाठी १४,७९,६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १२,७८,०४४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. अंतिम टप्प्यासाठी २६ ते २७ ऑगस्टदरम्यान ७९ नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ४९,३३९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-दोन भरून पसंतीक्रम नोंदवला आहे. याशिवाय विविध कोट्यांतर्गत २,१९६ विद्यार्थ्यांनीही पसंतीक्रम निश्चित केला आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करणे बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या तारखा

• अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – २९ ऑगस्ट, सकाळी ८ वाजता

• प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत – ३० ऑगस्ट, सायंकाळी ६ वाजेपर्यंत