बेळगावमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावच्या येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र मैदानावर बोलताना प्रक्षोभक विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा असे विधान त्यांनी केले.

या सर्व विधानांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुनच बेळगाव पोलिसांनी संभाजीराव भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against sambhaji bhide
First published on: 13-04-2018 at 21:25 IST