मुंबई : मुंबई सेंट्रल येथील हाजीअली परिसरातील सुप्रसिद्ध हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये रविवारी सकाळी आग लागली. तळमजल्यावरील दोन बंद गाळ्यांमध्ये ही आग लागली आहे. आगीच्या धुराचे लोट रस्त्यावरही येतं असून आग विझवण्याचे काम अग्निशमन दलामार्फत सुरु आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत आगीच्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत.

मुंबई सेंट्रलच्या हाजीअली येथील हिरापन्ना या शॉपिंग सेंटरमध्ये रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास आग लागली. पंडित मदनमोहन मालवीय मार्गावरील हिरापन्ना हे शॉपिंग सेन्टर केवळ तळमजला स्वरूपाचे आहे. मोबाईल, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्त, परफ्युम यांची असंख्य लहानलहान दुकाने या शॉपिंग सेंटरमध्ये आहेत. यातील दोन बंद गाळ्यांमध्ये ही आग लागली होती. गाळ्यांमधून बाहेर येणारा धूर संपूर्ण शॉपिंग सेंटरमध्ये पसरला असून रस्त्यावरूनही हे धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हिरापन्ना हे शॉपिंग सेंट्रल बैठ्या स्वरूपाचे असून आतमध्ये चिंचोळ्या वाटा आहेत. त्यामुळे आग विझवणे हे अग्निशमन दलासाठी मोठे जिकरीचे ठरत आहे.

हेही वाचा…‘म्हाडा’तही लवकरच सामान्यांच्या तक्रार, निवारणासाठी शिखर समिती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात मुंबईत आगीच्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री गोरेगाव येथे जंगलात लागलेली आग रविवारी पहाटे विझली. तर शनिवारी सकाळी कुर्ला येथील भंगार गोदामालाही मोठी आग लागली होती.