मुंबई : सांताक्रुझ येथील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेल जवळील ‘जुहू रेसिडेन्सी’ हॉटेलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, अदानी कंपनीचे कर्मचारी, रुग्णवाहिका व संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची आरोग्याच्या ‘व्हिजन २०३५’ ची घोषणा पोकळ!, अद्याप समितीचीही नियुक्ती नाही…

हेही वाचा – दाऊदवरील विष प्रयोगाचे वृत्त अफवा, गेल्या आठवड्यात दाऊद तपासणीसाठी रुग्णालयात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगीचा भडका उडू नये यासाठी अग्निशामकांनी इमारतीतील विजपुरवठा खंडीत केला. चार मोटार पंपसह इतर यंत्रांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सायंकाळी ६.२० च्या सुमारास आग विझविण्यात अग्निशामकांना यश आले.