रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्य शाखेमध्ये घुसण्यासाठी एका माथेफिरू व्यक्तीने आपल्याकडील एअरगनने हवेत फायर केल्याची घटना मंगळवारी घडली. संबंधित व्यक्तीला बॅंकेच्या सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले असून, त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एक व्यक्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याकडे काहीतरी हत्यार असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याने आपल्याकडील एअरगनच्या साह्याने हवेत फायर केले. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील एअरगन काढून घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
रिझर्व्ह बॅंकेत घुसण्यासाठी माथेफिरूचे एअरगनने हवेत फायरिंग
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्य शाखेमध्ये घुसण्यासाठी एका माथेफिरू व्यक्तीने आपल्याकडील एअरगनने हवेत फायर केल्याची घटना मंगळवारी घडली.

First published on: 02-04-2013 at 05:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing by unidentified person outside reserve bank of india building