मुंबई : व्हीआयपीस् ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या कुटुंबियांशी संबंधित ८ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालयानाय (ईडी), मुंबईने टाच आणली आहे. त्यात पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यलये, तसेच अहमदनगर येथील जमिनीचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ३६६.९२ चौ.मी. पाच सदनिका, १३९.३९ चौ.मी.चे दोन सभागृह, पुण्यातील ३६६.९२ चौ.मी.ची दोन कार्यालये व अहमदनगर येथील दोन हेक्टर जमीन या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. सामान्य नागरिकांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…

हेही वाचा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

चांगला परतावा देण्याच्या नावाखाली गुंतवणूक योजना व ट्रेडिंगमध्ये आमिष दाखवून आरोपींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमांतून विविध बँक खात्यात गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. याप्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत वास्तव्याला असलेला विनोद खुटे हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सेवा, फॉरेक्स ट्रेडिंच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे.

विनोद खुटेने मेसर्स व्हीआयपीस् व्हॉलेट प्रा.लि.सह व्हीआयपीस् ट्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स काना कॅपिटल्स लिमिटेड, मेसर्स ग्लोबल एफिलिएट बिझनेस, व्हीआयपीस् सिक्युरिटीज आणि व्हीआयपीस् प्रॉपर्टीज अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. त्यामार्फत गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली. ती रक्कम बनावट कंपनी व खात्यांच्या माध्यमतून व्यवहारात आणण्यात आली. त्यानंतर हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून भारतातून दुबईला पैसे पाठवण्यात आले. हे व्यवहार तपास यंत्रणाच्या नजरेत येऊ नये यासाठी यूएसडीटी सारख्या कूट चलनाचा वापर करण्यात आला.

हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

आतापर्यंत विनोद खुटेने केलेल्या खर्चाचा तपशील ईडीने तपासला असता गुन्ह्यातील रक्कम १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या रकमेतून दुबई व भारतात मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ईडीने विनोद खुटे यांच्याशी संबंधित पुणे, अहमदाबाद, मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले होते. तसेच मार्च महिन्यात दुबईतील ३७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्यानंतर शुक्रवारी ५८ बँक खात्यांमधील २१ कोटी २७ लाख रुपये व तीन कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ७० कोटी ८९ लाख रुपयांच्या मालममत्तेवर ईडीने टाच आणली आहे.