मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भाजप हा विषय सोडणार नसून सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिला.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा हस्तक्षेप आदी मुद्दयांवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन उभारणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना केंद्रातील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास गेले असताना सोमय्यांवर हल्ला झाला. त्यांना झेड सुरक्षा असतानाही हा प्रकार झाला. कार्यकर्ते दगड घेऊन जमले असताना महापालिका सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, असा सवाल पाटील यांनी केला.