भाजपचे ज्येष्ठ नेते राम कापसे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास कल्याण येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
१९३३ साली ठाणे मधील जव्हार येथे त्यांचा जन्म झाला. जनसंघ आणि त्यानंतर भाजपचे राज्यासह देशभरातील आघाडीचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. कापसे १८८९-९६ च्या काळात ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते. तर १९९६ ते १९९८ या काळात ते राज्यसभेचे सदस्य राहिले. त्यांनी २००४-०६  अंदमान- निकोबारचे राज्यपालपदही भुषवले होते.
राम कापसे यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.