Former Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar Passes Away : शिवसेनेच्या ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं.

हेही वाचा – सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ महाडेश्वर यांचं पार्थिव दुपारी २ सांताकृझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथून स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

हेही वाचा – “…तर अजित पवारांनी स्वत:च्या नावासमोर मुख्यमंत्री लावावं”, भाजपा मंत्र्याचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. २००२ मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये ते मुंबईच्या महापौर झाले. २०१७ ते २०१९ या कालावधीदरम्यान त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं. तसेच २०१९ त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.