‘विघ्नहर्ता बिल्डर्स’च्या नावाने खोटी लेटरहेड बनवून ग्राहकांना फसविण्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.
भोईवाडा येथे ‘विघ्नहर्ता बिल्डर्स’चा बांधकाम प्रकल्प सुरु आहे. मात्र तेथेच अन्य एका जागेवर ‘ट्रायडन्ट’ इमारत उभी रहात असून तो प्रकल्प ‘विघ्नहर्ता बिल्डर्स’चा असल्याचे सांगत तशी त्या कंपनीच्या नावाने लेटरहेडवर जाहिरात करण्यास ‘कमला लॅण्डमार्क’ कंपनीचा संचालक जितेंद्र जैन याने सुरुवात केली. जैन याने या बनावट लेटहेड आणि ब्रोशरच्या आधारे सदनिकांची नोंदणी सुरू केल्याचा आरोप विघ्नहर्ता बिल्डर्सने केला आहे. या प्रकरणी न्यायालयात धाव घेऊन विघ्नहर्ता बिल्डर्सने हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात जितेंद्र जैन आणि सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाणे तपास करत असल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.