मुंबई : कोलकात्यातील जमिनीत दडवलेला हजारो कोटी रुपयांचा खजिना सापडला असून त्याचा लाभार्थी बनवण्याचे आमिष दाखवून मुंबईमधील भुलेश्वर परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भुलेश्वर परिसरातील रहिवासी कमल जाजू (५८) यांना १ ऑक्टोबर रोजी आरोपी नौशाद सय्यद शेख भेटला. कोलकाता येथील शांतीलाल पात्रा यांच्या जमिनीमध्ये हजारो कोटी रुपयांचा खजिना सापडला असून त्यात लाभार्थी बनवून हजारो कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष नौशादने जाजू यांना दाखविले. त्यानंतर विविध निमित्त करून नौशादने जाजू यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. जाजू यांनी १ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत स्वत:च्या, पत्नीच्या आणि एका नातेवाईकाच्या बँक खात्यातून चार लाख ६० हजार रुपये, ७६ लाख ६५ हजार रुपये, ६८ लाख १० हजार रुपये नौशादला पाठवले. त्यानंतर डिमांड ड्राफ्टद्वारेही सहा लाख सहा हजार रुपये दिले. जाजू यांनी एकूण एक कोटी ५० लाख रुपये नौशादला दिले.

हेही वाचा – मुंबई : हवालदाराला विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण भोवलं, वरिष्ठांनी केली मोठी कारवाई

हेही वाचा – “१४० कोटी घेतले अन् ३८ कोटींचे…”, ऑक्सिजन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाजू यांचा विश्वास संपादन करण्यासाठी नौशादने जाजू यांच्या खात्यात १२ लाख १० हजार रुपये इंजक्शन चार्जेसच्या नावाखाली पाठवले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाजू यांनी याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. या संपूर्ण गैरव्यवहारात नौषादला अन्य सहा व्यक्तींनी मदत केल्याचा आरोप आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.