गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच. मात्र गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. अनेकदा ऐनवेळी गुरुजीही मिळत नाहीत. ऑफीसला सुटी नसणे आणि इतर काही कारणांमुळे आपल्यालाच गणपतीची स्थापना करावी लागते. अशावेळी आपल्याला पूजेची योग्य ती माहिती असल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने पुढाकार घेतला असून व्हिडियोच्या माध्यमातून पुजेचा विधी सांगितला आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पाहा व्हिडीओ –