तिसऱ्या लाटेसाठी पालिके ची जनुकीय प्रयोगशाळा सज्ज

मुंबई : करोना विषाणूंच्या जनुकीय रचनांमधील बदल शोधण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जनुकीय प्रयोगशाळा नुकतीच सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत एकावेळी ३८४ नमुन्यांची तपासणी करता येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळेमुळे करोनाचे नवे प्रकार वेळीच शोधणे शक्य होणार आहे. अनेक दिवस करोनाने आजारी असलेल्या रुग्णांचे तसेच अतिसंक्रमित विभागातील रुग्णांचे व परदेशातून आलेल्यांचे नमुने हे जनुकीय चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र बसवण्यात आले असून प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. बुधवारी या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळेचा मोठा फायदा होणार असून करोना विषाणूचा नवा प्रकार आला असल्यास त्याची ओळख लवकर पटू शके ल. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करून त्याला अटकाव करणे शक्य होणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त के ला आहे. या प्रयोगशाळेतून जास्तीत जास्त चार दिवसात चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे.

प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर आता गुरुवारपासून नमुने गोळा करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. हे नमुने गोळा करताना सरसकट सगळ्यांच्या चाचण्या या पद्धतीने के ल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोणाच्या जनुकीय चाचण्या?

जनुकीय चाचणी ही करोनाची सामान्य चाचणी नाही. सगळ्या रुग्णांची जनुकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही.  मात्र एखादा रुग्ण खूप दिवस रुग्णालयात दाखल असेल तर त्याची जनुकीय चाचणी के ली जाणार आहे. तसेच परदेशातून आलेल्या एखाद्या प्रवाशाला करोना झाला तर त्याचीही जनुकीय चाचणी के ली जाईल. त्याचबरोबर एखाद्या इमारतीत किं वा वसाहतीत एकाच वेळी अनेक रुग्ण आढळून आले तर अशा ठिकाणचे नमुनेही जनुकीय प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. एखादा रुग्ण करोनामुळे दगावला तर त्याच्या नमुन्यांचीही चाचणी के ली जाईल. चाचणी करताना करोना विषाणूचा नवा प्रकार आहे का, त्यात काही जनुकीय बदल झाले आहेत का हे तपासले जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

संयंत्र दान स्वरूपात

अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राइट स्टोनब्रिज ग्रुप (एएसजी-बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किमतीचे २ जिनोम सिक्वेसिंग संयंत्र मुंबई महानगरपालिकेला दान स्वरूपात दिले आहे. त्यासोबत ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांनीही ४ कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. या यंत्रामध्ये एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत अहवाल प्राप्त होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबईत २००५ साली अतिवृष्टीनंतर अचानक लेप्टोची लागण वाढलेल्या काळात तपासणी महत्त्व ओळखून अगदी कमी वेळात विषाणू विज्ञान प्रयोगशाळा कस्तुरबामध्ये सुरू केली. त्यानंतर आता करोनाच्या संकटात विषाणूच्या उत्परिवर्तनाचे वेळीच निदान करण्यासाठी पालिकेने विक्रमी वेळेत ही जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) प्रयोगशाळा सुरू केली. विशेष म्हणजे यासाठी पालिकेने कोणाच्याही आर्थिक मदतीची वाट न पाहता सामाजिक उत्तरदायित्वातून हा मोठा प्रकल्प उभारला, या शब्दामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genetic testing corona patients several days ssh
First published on: 06-08-2021 at 00:40 IST