डार्कनेट, आभासी चलनाद्वारे व्यवहार; प्रतिबंध घालण्याचे यंत्रणांसमोर आव्हान
जयेश शिरसाट
मुंबई : कोके नपाठोपाठ आता परदेशी, संकरित गांज्याचा विळखा मुंबईसारख्या महानगरांना पडू लागला असून त्यास प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. डार्कनेट, आभासी चलनाद्वारे व्यवहार आणि मनुष्यविरहित वाहतुकीमुळे परदेशी गांज्याच्या तस्करीची चाहूल लागत नाही. परिणामी, विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार राजरोस सुरू असल्याचे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी), गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उच्चमध्यम वर्ग, श्रीमंत परिवारातील तरुणांमध्ये परदेशी, संकरित गांज्याचे (वीड, बड) आकर्षण वेगाने वाढते आहे, असे स्पष्ट के ले. काही वर्षांपूर्वी कोकेन तरुणांमध्ये प्रथम पसंतीचा अमली पदार्थ होता. मात्र अलीकडे भिन्न चवींचा, वेगवेगळे परिणाम देणाऱ्या परदेशी गांज्याचे लोण महानगरांमध्ये पसरले आहे.
कॅ नडा, अमेरिका, आफ्रि का खंडातील काही देशांमध्ये संकरित गांज्याचे उत्पादन घेतले जाते. भारतीय गांजा १५ रुपये तर संकरित गांजा पाच ते आठ हजार रुपये प्रतिग्रॅम इतक्या दराने विकला जातो. उत्पादकांपासून मुंबईसारख्या महानगरांमध्ये गांज्याची किरकोळ विक्री करणाऱ्यांपर्यंत अनेक व्यक्तींची साखळी तयार होते. त्यात उत्पादक, साठेबाज, पुरवठादार, वाहक, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचा समावेश असतो. पोलिसांचे खबरे साखळीतील प्रत्येकाचा माग काढून, चाहूल घेऊन नेमकी माहिती टिपू शकतात. त्याआधारेच कारवाया होतात. मात्र परदेशी, संकरित गांजा विकणाऱ्यांचे अस्तित्व डार्कनेटवरच आढळते. त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर व्यवहारासंबंधी चर्चा प्रत्यक्ष भेटून, मोबाइल किं वा दूरध्वनीद्वारे होत नाही. विक्रेता प्रचलित नसलेल्या किंवा नव्याने सुरू झालेल्या एखाद्या मेसेजिंग सव्र्हिस किं वा अॅपचा पर्याय देतो. त्यावर ऑर्डर दिली जाते, तर त्याची किं मत आभासी चलनाद्वारे अदा होते. गांजा कुरिअर सेवेमार्फत ठरलेल्या पत्त्यावर पोहोचतो.
आतापर्यंत एनसीबीने के लेल्या कारवायांमध्ये खाद्यपदार्थ, औषधे, ग्रीन टी आदीचा उल्लेख गांजा दडविलेल्या पार्सलवर आढळला. ही पार्सल युरोप, कॅ नडा, अमेरिके तून मुंबईच्या पत्त्यावर पाठवण्यात आली होती. डार्कनेट, आभासी चलनाद्वारे दोनच व्यक्तींमध्ये व्यवहार होतो. दोघांनाही एकमेकांची खरी ओळख कळत नाही. त्यामुळे ते पकडणे आव्हानात्मक ठरते. अनेकदा विदेशी टपाल कार्यालयात येऊन पडलेले संशयास्पद पार्सल हाती लागते. मात्र ते कोणी कोणासाठी पाठवले हे मात्र समजत नाही, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.
विविध ठिकाणी कारवाई
’ ८ जून : बेलार्ड पियर येथील विदेशी टपाल कार्यालयात प्राण्यांचे खाद्य असे नमूद असलेल्या पार्सलमधून सव्वादोन किलो विविध चवींचा परदेशी गांजा एनसीबीने जप्त के ला. हे पार्सल कॅ नडावरून मुंबईच्या पत्त्यावर पाठविण्यात आले होते.
’ १७ एप्रिल : डोंबिवलीतील ‘पलावा सिटी’ या निवासी संकु लात जमीनविरहित किं वा फक्त पाणी आणि कार्बन वायूआधारे (हायड्रोपोनिक) सुरू असलेली गांजाची शेती एनसीबीने उद्ध्वस्त के ली. या कारवाईत अटक झालेला अर्शद खत्री उच्चशिक्षित असून अशा प्रकारच्या शेतीतील तज्ज्ञ आहे. अॅम्स्टरडॅम, नेदरलॅण्ड येथून डार्कनेटआधारे बियाणे विकत घेऊन अर्शदने पलावा सिटीतील नातेवाईकाच्या घरात आतापर्यंत गांजाची चार पिके घेतली. हा गांजा मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये ८० हजार रुपये तोळा या भावाने विकला गेला.
’ १२ एप्रिल : परळ गावातून दोन तरुणांना एनसीबीने अटक के ली. त्यांच्याकडे एलएसडीच्या साठय़ासह ब्लॅकबेरी, फॉरबीडन आदी नावांनी विकला जाणारा ३१० ग्रॅम क्युरेटेड गांजा सापडला. चार दिवस आधी एनसीबीने ओशिवरा येथूनही क्युरेटेड गांजा विकणाऱ्या दोन तरुणांना अटक के ली होती.