घाटकोपर मेट्रो स्थानकात तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेट्रो स्थानकाच्या स्वच्छतागृहात एका तरुणीने मंगळवारी रात्री विषप्राशन करुन आत्महत्या केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणी साकीनाका येथील रहिवाशी असून, मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱयांना स्वच्छतागृहात ती विषप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आली. कर्मचाऱयांनी तिला तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.