मुंबई : ‘ योग हा भारताचा अमूर्त वारसा असून आहे. आर्थिक विकास होत असताना लोकांच्या जीवनातील ताणतणाव वाढत असून मन तणावमुक्त नसेल तर आरोग्य राहणार नाही. यास्तव राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत कुलगुरुंशी विचारविनिमय करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवन येथे आयोजित योगसत्रात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून जगभर योग दिवस साजरा करण्यात आला. ज जगात अनेक देशात लोक योग करोत आहेत. परंतु आपल्या देशात बहुतेक लोक चाळीशी – पन्नाशी ओलांडल्यानंतर योग सुरु करतात. लहानपणापासून योग करण्याची सवय लावून घेतली, तर अधिकाधिक लोकांना निरामय जीवन जगता येईल. योग म्हणजे निव्वळ शारीरिक असणे नसून योग ही जीवन पद्धती म्हणून अंगिकारली पाहिजे. किमान अर्धा तास योगसाठी दिला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी योग प्रशिक्षक रवी दीक्षित तसेच कैवल्यधाम संस्थेचे डॉ. गणेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगासने, प्राणायाम व योग क्रिया केल्या.
भाजप मुख्यालयात योगदिन साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपच्या प्रदेश मुख्यालयात योगशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश योगप्रमुख योगीराज भारत भूषण यांनी योगसाधनेचे महत्व विषद करत विविध योगाभ्यास करवून घेतला. या कार्यक्रमात प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, मोहन बने, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सह सचिव भरत राऊत, कार्यालय कर्मचारी सहभागी झाले होते.