अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केली. केंद्र सरकार ५० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याबाबत सकारात्मक असून मळी नियंत्रणमुक्त करण्याचा आदेशही लवकरच काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.