मुंबई : कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्याकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, नवनवीन अभ्यासक्रम व सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात कौशल्य विकास क्षेत्र कशाप्रकारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, विविध उद्याोगांना कोणकोणत्या कौशल्यांची आवश्यकता भासत आहे, या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी कोणत्या? याबाबतही जाणून घेता येणार आहे. तसेच परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची ओळख आणि प्रवेशप्रक्रियेसंबंधित विविध प्रश्नांची उत्तरेही ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत मिळणार आहेत. माटुंगा पश्चिमेकडील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत कौशल्य विकास क्षेत्राबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर मार्गदर्शन करणार आहेत. दहावी, बारावी, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांनंतर कौशल्य विकास क्षेत्रासंबंधित कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पारंपरिक विद्याशाखांची पदवी प्राप्त करूनही कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल का? प्रवेशप्रक्रिया कशी असेल? रोजगाराच्या संधी कोणत्या? कोणकोणत्या क्षेत्रांत कशा पद्धतींच्या कौशल्यांची आवश्यकता आहे आणि त्या कौशल्यांशी निगडित अभ्यासक्रम कोणते? आदी विविध गोष्टींबाबत डॉ. अपूर्वा पालकर संवाद साधणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींचा मागोवा बख्तावर कृष्णन घेणार आहेत. परदेशातील विविध उच्च शिक्षणाच्या संधी, परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, विद्यापीठाची निवड कशी करावी आदी गोष्टींबाबत बख्तावर कृष्णन मार्गदर्शन करतील.

Self assessment is essential before going for higher education abroad Bakhtawar Krishnan
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यापूर्वी स्वमूल्यांकन आवश्यक- बख्तावर कृष्णन
pune, Scholarship Delays of phd research students, pune s phule wada to Mumbai s vidhan bhavan Statewide Long March, phd Research Students,
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; फुलेवाडा ते विधानभवन मार्गावर पायी फेरी
Loksatta explained Why do students oppose the new foreign scholarship policy
विश्लेषण: परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला बहुजन विद्यार्थ्यांचा विरोध का?
investment guidance in loksatta arthasatta event for mmrda employee
 ‘बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी आणि कुठे?’ उद्या ‘एमएमआरडीए’च्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकदार जागर
The number of students giving the NEET exam in Marathi decreased
विद्यार्थ्यांचेच मराठीकडे ‘नीट’ दुर्लक्ष; मराठीतील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत साशंकता
Mumbai university marathi news
पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Need for regulation to prevent misuse of artificial intelligence says Vivek Sawant
कृत्रिम बुध्दिमत्तेचा दुरुपयोग टाळण्यासाठी नियमनाची गरज, शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत विवेक सावंत
probable dates for cet soon announced by state common entrance test cell
एमएचटी-सीईटीचा निकाल कधी? विविध प्रवेश परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर

हेही वाचा >>>सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे कोकणवासीय हैराण, रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांची दमछाक वाढली

दहावी व बारावी परीक्षेच्या निकालानंतर गोंधळलेल्या मन:स्थितीतून बाहेर कसे पडावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते कसे असावे, याबाबत डॉ. हरीश शेट्टी (२५ मे) व डॉ. राजेंद्र बर्वे (२६ मे) संवाद साधतील. नव्या वाटा या सत्राअंतर्गत युट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर विश्लेषण करणार आहेत. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा मागोवा विवेक वेलणकर घेणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये असेल.

कुठेदादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्य मंदिराच्या मागे, माटुंगा (पश्चिम)

कधी शनिवार, २५ मे आणि रविवार, २६ मे रोजी

केव्हासकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

२५ मे : http:// tiny. cc/ LSMargYashacha25 May

२६ मे : http:// tiny. cc/ LSMargYashacha26 May

प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दादर पश्चिमेकडील छबिलदास मार्गावरील ७ अब्बास मॅन्शन, फॅमिली स्टोअर येथे सकाळी ९.३० ते १.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट