मुंबई : वकील गुणरत्ने सदावर्ते यांना दूरध्वनीवरून धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी भोईवाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा – अकरावी प्रवेश : दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास १ लाख ३४ हजार जागा रिक्त, द्विलक्षी विषयासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश

हेही वाचा – शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदावर्ते यांच्या मोबाइवर शुक्रवारी रात्री उशीरा व्हॉट्सॲप कॉल आला होता. यापूर्वी मे महिन्यात त्याच मोबाइल क्रमांकावरून सदावर्ते यांना धमकावण्यात आले होते. त्यावेळीही पोलीस तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी संभाषण करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राहिल असल्याचे सांगितले होते. आताही त्याच व्यक्तीने दूरध्वनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भोईवाडा पोलिसांनी शनिवारी तक्रार नोंदवून घेतली असून याप्रकरणी तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.