हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि गोवंडी या स्थानकांदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने बुधवारी लोकल सेवा कोलमडली. ऐन गर्दीच्यावेळी सकाळी सात वाजता ही घटना घडल्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक बिघडले. या घटनेनंतर २२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्याचा परिणाम गाडय़ा सुमारे अर्धा तास उशीरा धावत होत्या. तुटलेला रुळ सांधण्यासाठी ३५ मिनिटांचा कालावधी लागला. या वेळेत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाडय़ा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अखेर सकाळी ७.३५ वाजता वाहतूक पूर्ववत झाली. या अध्र्या तासाच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी जमली होती. सेवा पूर्ववत झाल्यानंतरही गाडय़ा २५-३० मिनिचे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हा गोंधळ दुपारी उशिरापर्यंत सुरू होता.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
रुळाला तडा गेल्याने हार्बर रखडली
हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि गोवंडी या स्थानकांदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने बुधवारी लोकल सेवा कोलमडली.
First published on: 15-08-2013 at 02:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line disturbed crack n the track