हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

सानपाडाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. सानपाडाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाशी-पनवेल मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूकीचा खोळंबा झाल्याने प्रवासी देखील संतप्त झाले आहेत. तूर्तास सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Harbour line trains affected due to point trouble at vashi