विनातिकीट, मुखपट्टीशिवाय स्थानकातही मुक्तसंचार

मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच फक्त लोकलमधून प्रवासाची परवानगी असताना मध्य रेल्वेवर फे रीवाले मात्र बिनदिक्कतपणे प्रवास करत आहेत. मुखपट्टीही न लावता फेरीवाले रेल्वेच्या डब्यांमध्ये फिरताना आढळून येत आहेत. तिकीट तपासूनच स्थानकात प्रवेश देण्यात येत असताना फे रीवाल्यांना प्रवेश कसा मिळतो, असा प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित के ला आहे.

करोनाच्या संसर्गामुळे सामान्यांच्या लोकल प्रवासावर बंदी घालून फक्त अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यासाठी स्थानकाच्या प्रवेशद्वारांजवळ रेल्वे पोलिसांना तैनात के ले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र व तिकीट तपासल्यानंतरच त्यांना स्थानकात प्रवेश दिला जात आहे. असे असतानाही रेल्वे स्थानकात व लोकलमध्ये फे रीवाले बिनदिक्कतपणे फिरत आहेत. मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये ही स्थिती दिसून येते. महिलांसाठी राखीव डब्यात तर फे रीवाल्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अन्य प्रवाशांना प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या फे रीवाल्यांना लोकलमधून उतरवण्याचा प्रयत्न महिला प्रवाशांनी करताच ते अनेकदा प्रवाशांशी वादही घालतात.  स्थानकात पोलीस तैनात असले तरीही स्थानकांलगत अनेक अनधिकृत प्रवेशद्वारेही आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करून कारवाई करणे शक्य नाही, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी फे रीवाल्यांवर कारवाई के ली जात असल्याचे सांगितले.

रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी याला मध्य रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. ‘फेरीवाल्यांकडे रेल्वे पोलीस दुर्लक्षच करतात. कल्याण, डोंबिवलीतून निघणाऱ्या गाडय़ांमध्ये हमखास फे रीवाले दिसतात. ही स्थिती ठाणे व त्यानंतर कु ल्र्यापर्यंत असते,’ असे त्या म्हणाल्या.

पश्चिम रेल्वेवर कारवाई

पश्चिम रेल्वेवरही फे रीवाले व भिकाऱ्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यांच्यावर २०२१ मध्ये के लेल्या कारवाईत ७ हजार ६९९ फे रीवाले व भिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून एकू ण १९ लाख ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.