ऐन निवडणुकीच्या काळात शस्त्रांचा मोठा साठा नेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बकरी ईदनिमित्ताने विकण्यासाठी ही शस्त्रे घेऊन जात असल्याचे स्पष्टीकरण या व्यक्तीने दिले आहे.
पार्कसाईट, विक्रोळी येथे राहणारा अब्दुल रहीम सय्यद हा गुरुवारी सायंकाळी टॅक्सीतून १२०० सुरे आणि ४०० चॉपर घेऊन नळबाजार येथे जात होता. शीव -ट्राँबे रस्त्यावर प्रियदर्शनी येथे पोलिसांनी ही टॅक्सी थांबवून तपासणी केली असता त्यांनी टॅक्सीत शस्त्रे आढळली.