मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डॉ. अंकेत जाधव या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ३९५ वा क्रमांक प्राप्त करीत यशाला गवसणी घातली. आई – वडील दोघेही शेतकरी व जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन डॉ. अंकेत जाधव याने ‘यूपीएससी’ परीक्षेत ३९५ वा क्रमांक प्राप्त केला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिवानी गावातील शेतकरी कुटुंबात डॉ. अंकेत जाधव याचा जन्म झाला. आई – वडील दोघेही शेतकरी, जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, महात्मा फुले विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण, नांदेडमधील यशवंत महाविद्यालयात अकरावी व बारावी पर्यंतचेस शिक्षण आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण डॉ. अंकेत जाधव याने घेतले. असा शैक्षणिक प्रवास पूर्ण करून तो सध्या वाकोडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा : फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli farmer son dr anket jadhav clear upsc exam with 395 rank in first attempt mumbai print news css
First published on: 17-04-2024 at 17:41 IST