महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाने दिलेल्या वेबसाईटवर त्यांचा निकाल बघता येईल, असे मंगळवारी जाहीर करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली होती. खालील वेबसाईट्सवर निकाल पाहता येईल
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.result.mkcl.org
http://www.rediff.com/exams
http://maharashtra12.knowyourresult.com

मोबाईलवरूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
– बीएसएनएल मोबाईलवरून mhhsc(स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा
– एअरटेल मोबाईलवरून  MAH12 (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५२०७०११ या क्रमांकावर पाठवावा
– आयडीया, वोडाफोन, टाटा डोकोमो, रिलायन्स, बीएसएनएल टेलेनॉर या कंपन्यांच्या मोबाईलवरून MAH12 (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवावा.