मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी पालिका मुख्यालयात पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या या पेन्शन अदालतमध्ये तब्बल साडेतीनशे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. त्यामुळे पालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीत निवृत्त कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> “…तर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘पर्मनंट’ करू”, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या मुख्यालयात पहिल्यांदाच ‘पेन्शन अदालत’ चे आयोजन केले होते. या पेन्शन अदालतला निवृत्त कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पेन्शन अदालतमध्ये आज १२९ लोकांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला. तसेच २५० तक्रारी ऑनलाईन माध्यमातून प्राप्त झाल्या. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन माध्यमातून वितरित करण्यात आले. येत्या १५ दिवसांत या सर्व लोकांना त्यांचे पेन्शन प्राप्त होईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील अडचणी सोडवण्याचे आणि पुढील ३० ते ६० दिवसांत सर्वांचे निवृत्ती वेतन वितरित करावे, असे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>> हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : चित्रकार चिंतन उपाध्याय दोषी, विशेष न्यायालयाचा निर्णय

मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रश्नांचे यावेळी निराकरण करण्यात आले. या बैठकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांतूनन संबंधित प्रशासकीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन ए ते टी विभागांतील प्रशासकीय अधिकारी, के.इ.एम, राजावाडी, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय येथील प्रशाकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व इतर संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन संदर्भातील प्रश्न आणि अडचणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तात्काळ सोडवण्यात येतील.

प्रसंगी बोलतांना पालकमंत्री लोढा म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पेन्शन साठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असे कष्टाने कमावलेले पेन्शन त्यांना सहज उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन आम्ही पेन्शन अदालत सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी देखील पेन्शन अदालत

पेन्शन अदालत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता या सभेची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता सभेची सांगता होईल.